ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
संजय नगर पुनर्वसन प्रकरणात महत्त्वपूर्ण प्रगती — एसआरए पुणेला दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांद्रा येथील एसआरए न्यायालयात संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाविरोधात दाखल याचिकेची सुनावणी पार पडली. या सुनावणीत आपल्या दाव्याच्या बाजूने काही महत्त्वपूर्ण आदेश शिखर तक्रार निवारण समिती, एसआरए कडून देण्यात आले आहेत. पुढील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण आदेश पारित करण्यासाठी एसआरए पुणे कार्यालयाला आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कृती समितीने नागरिकांसाठी सविस्तर माहिती देण्यासाठी लवकरच संजय नगरमध्ये सभेचे आयोजन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसाठी कृती समितीतर्फे माननीय मधुकर म्हस्के, विष्णू सातपुते, लालचंद पवार आणि ॲड. संतोष शिंदे उपस्थित होते.













