पिंपरी चिंचवडमध्ये होणार संघशक्तीचे भव्य दर्शन शहरात तब्बल ४५ स्थानी विजयादशमी उत्सव

संघशताब्दीनिमित्याने विशेष महत्व
हजारो संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागातील तब्बल २९ स्थानी तर दि.२ व ५ ऑक्टोबरला १४ ठिकाणी, २७ व ३० सप्टेंबर रोजी २ स्थानी असे एकूण ४५ स्थानी विजयादशमी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रहित, संघटन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा विजयादशमीच्या पावनपर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे या उत्सवांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात देखील तब्बल ४५ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या विजयादशमी उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे संबोधन होणार आहे. शिक्षण, समाजसेवा, माध्यमे, उद्योग, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दि.२८ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी शहरातील प्रमुख भागात पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.
संघशताब्दी निमित्याने पंचपरिवर्तन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि ‘स्व’बोध यासाठी कार्यरत आहेत.
शताब्दी वर्षानिमित्याने संघातर्फे या पाच प्रमुख मुद्द्यांवर समाजजागृती करण्यात येत आहे.
विविध भागातील कार्यक्रम स्थान खालील प्रमाणे –













