Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज बुधवारी (दि.३ डिसेंबर) सायं. ५ वाजता, आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह(लहान हॉल), येथे प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संस्थेचे अध्यक्ष व संपादक राजन लाखे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या काव्य संग्रहाची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक संभाजी बारणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास काव्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी बारणे यांनी केले आहे.
—————————-

Share.
Leave A Reply

Exit mobile version