प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर खंडेशेठ कोकणे युवा मंचाच्या वतीने रविवारी महिलांसाठी ‘न्यू होम मिनिस्टर’

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर खंडेशेठ कोकणे युवा मंचाच्या वतीने महिलांसाठी ‘न्यू होम मिनिस्टर’ हा भव्य कुटुंब-स्नेही उपक्रम रविवारी आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली ही स्पर्धा परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी खेळ, मनोरंजन, कला-स्पर्धा यांसह महालक्ष्मी झोळ स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा अशा आकर्षक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून होंडा अॅक्टिव्हा, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, साड्या यांसह अनेक घरगुती वस्तूंचे बंपर बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
कार्यक्रमासाठी ‘कोंबडी चोर’ फेम अभिनेता रामभाऊ जगताप यांच्या उपस्थितीचे विशेष औत्सुक्य असून, परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. महिलांमध्ये आपुलकी, आनंद आणि एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम प्रभागातील जनतेशी संवाद अधिक मजबूत करण्याची महत्त्वाची संधी ठरत असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे.
सागर खंडेशेठ कोकणे आणि त्यांच्या युवा टीमच्या पुढाकाराने आयोजित होणारा हा कार्यक्रम रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता कपसे लॉन, रहाटणी येथे पार पडणार असून, मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.



















