ताज्या घडामोडीपिंपरी
साधना कन्या विद्यालयात गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा

हडपसर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयतच्या चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त गणेशमूर्ती तयार करण्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थिनींनी स्वयंकल्पकतेने सुबक व सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या.
विद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील,उपमुख्याध्यापक आनंदराव करे,पर्यवेक्षिका तृप्ती पाटील,मंदाकिनी शिंदे,पौर्णिमा सावंत,आजीव सदस्य लालासाहेब खलाटे,आजीव सेवक तुकाराम डोंगरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.कलाशिक्षक धनेश पवार व राजेंद्र आडमुठे यांनी विद्यार्थिनींना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडली.















