ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

शालेय इमारतींचा ध्यास असणारे प्राचार्य एस. एन. पाटील सर

Spread the love

 

 

लेखक – प्रा. शहाजी रामचंद्र माने

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड परिसरात 1960 ते 1991 या काळात शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य म्हणून काम करणारे श्री एस एन पाटील यांचे नुकतेच निधन झाले. विशेषतः रयत शिक्षण संस्थेने त्यांनी विविध ठिकाणी काम केले. प्रारंभीची काही वर्षे ते संस्थेच्या माहुली जिल्हा सांगली व विटा जिल्हा सांगली येथील उपशिक्षक म्हणून काम केल्यानंतर मी 1964 मध्ये संस्थेमध्ये त्यांची बदली मुख्याध्यापक म्हणून पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय येथे केली.

पाटील सर बीएससी बीएड असल्याने ते गणित व शास्त्र विशेषतः जुन्या अकरावीला शिकवत असत पूर्वी म्हणजे 1971 पर्यंत प्रत्येक माध्यमिक विद्यालयात प्राचार्य किंवा मुख्याध्यापक वगळता एखादा दुसराच शिक्षक ट्रेन ग्रॅज्युएट बाकी सारे शिक्षक आणि अन ट्रेंड, कॉलेजची एक दोन वर्षे झालेले किंवा एस. टी. सी. सी.पी.एड शिक्षक असत. त्याकाळी शिक्षकांचे पगारही खूप कमी असत त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे वळण्‍याचा तरुणांचा कल कमी असे.

एस एन पाटील प्रशिक्षण संस्थेच्या विटा हायस्कूल जिल्हा सांगली येथे 1963 – 64 साली उपशिक्षक म्हणून काम करीत होते त्यावेळी मी तिथे जुन्या अकरावीच्या वर्गात होतो ते आम्हांला गणित, जनरल सायन्स, फिजिक्स केमिस्ट्री हे विषय शिकवत असत. पुढे 1964 च्या मे महिन्यात त्यांची मुख्याध्यापक म्हणून पिंपरी वाघेरे येथे नवमहाराष्ट्र विद्यालयात बदली झाली. पाटील सर आपल्या पत्नी इंदुमती पाटील व चार सहा महिन्याच्या मुलीला घेऊन पिंपरी वाघेरे येथे विद्यालयात हजर झाले. त्यावेळी विद्यालयास इमारत नव्हती आठवी नववी दहावी असे तीन वर्ग गावातील विविध मंदिरामध्ये (जुने मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी भरत असत. पिंपरी वाघेरे त्याकाळी रुक्ष खेडेगाव होते कोणत्याही प्रकारची सोय नाही पिंपरी रेल्वे स्टेशन गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पिंपरी गावात जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. पाटील सर साहित्य घेऊन पुणे स्टेशनवर उतरले व तेथून बैलगाडीने पिंपरीस एकंदरीत शाळेची स्थिती विदारक होती. आणि इथून त्यांच्या कार्याची खरी सुरुवात झाली.

गावात राहिला एका घरी सोय झाल्यावर त्यांनी गावातील काही प्रमुख ग्रामस्थांची भेट घ्याव्यात सुरुवात केली. त्या काही गावचे सरपंच एकनाथ इंगळे होते त्यांची भेट घेतली नंतर हरी शेठ वाघेरे एकनाथ नाणेकर, गोलांडे मामा, निवृत्ती वाळुंजकर, किसनराव वाघेरे, भिकू वाघेरे पाटील आदी अनेक प्रमुख नागरिकांना भेटून शाळेच्या इमारतीची गरज असल्याची त्यांनी पटवून दिली. गावातील लोकांनाही या विषयाचे महत्त्व वाटू लागले आणि लोकांच्या देणगीतून इमारत बांधण्याची ठरले यासाठी गावाला लागून असलेली गायरान जागा सगळ्यांनी प्रयत्न करून मिळवली व चार वर्गाची केलेली इमारत उभी केली आणि विद्यार्थ्यांची बसायची सोय झाली.

पुढे ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड अस्तित्वात आल्यानंतर पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने शाळेला आर्थिक मदत मिळू लागली विद्यार्थी संख्या वाढू लागल्याने आणि इमारती स्लॅबची इमारत मुला-मुलींची स्वच्छतागृही महापालिकेच्या देणगीतून उभारली गेली. दरम्यानच्या काळात एस एन पाटील सरांची बदली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे झाली. तेथेही इमारतीचे काम करून पाटील सर परत पिंपरीस बदलून आली. त्यावेळी या परिसरातील लायन्स क्लबच्या सहकार्याने शास्त्र प्रयोगशाळेत शास्त्रीय साहित्याची देणगी मिळवली. 1978 पाटील सरांची बदली कर्मवीर विद्यालय वाडा जिल्हा पुणे येथे झाली पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मी रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक म्हणून नोकरीस लागलो होतो. आणि वाड्याच्या शाळेत उपशिक्षक म्हणून काम करीत होतो त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला संधी मिळाली. वाडा त्या काळात खेड तालुक्याच्या पश्चिमेस 30 किलोमीटरवर असलेले एकमेव विद्यालय पुण्याहून खेड वरून सुटणाऱ्या एसटी वर्सेस वाड्यापर्यंतच येत असत तेथून पुढे दळणवळणाची साधने फारच कमी विद्यार्थी फार लांबून शाळेत येत गाव फार सुरेख व बऱ्यापैकी सुधारलेले एक प्रशस्त पेठ पण सर्व प्रकारचे दुकाने सरकारी आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा सोसायटी दूध संकलनाचे मोठे केंद्र पुण्यात दररोज सुमारे दहा हजार लिटर दूध पुण्यात कात्रज डेअरीला टँकर ने जात असे.

 

भीमाशंकर ऑइल मिल,आठवड्याचा बाजार मोठा भरत असे.भुईमूग शेंगा, तांदूळ, भाजीपाला आधी सर्व प्रकारची कापड दुकाने हॉटेल्स यामुळे गावात सतत गजबजलेले असे गावातील लोक एकोप्याने व गुन्ह्या गोविंदाने राहत होती. या ठिकाणी काम करण्याची संधी पाटील सरांना मिळाली. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविधा सुविधा पत्नी इंदुमती पाटील याही या शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या कर्मवीर विद्यालयाची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत होती त्याच वर्षी विद्यालयाचा दहावीचा निकाल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने लागला होता. वाडा आणि परिसरातील गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दहावी पास झाले होते. अकरावीला प्रवेश घ्यायचा म्हणजे 30 किलोमीटरवर असलेल्या खेड येथे जावे लागेल ही गरज लक्षात घेऊन पाटील सरांनी ग्रामस्थांच्या मदतीने व सहकार्याने ज्युनिअर कॉलेजची परवानगी आणण्याची ठरविली ग्रामस्थांची मीटिंग घेऊन चर्चा करून पाटील सर शाळेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष अनंत गुणाजी केदारी (अंतूशेठ), ग्रामस्थ सुदामराव पवार गावचे सरपंच बाळासाहेब शेटे उपाध्यक्ष प्रभाकर शेटे पंजाबी आदी शिष्टमंडळ घेऊन मुंबईला शिक्षण मंत्र्यांना भेटून अकरावी परवानगीसाठी गेले त्यावेळी मलाही त्यांच्या समवेत जाण्याची संधी मिळाली त्यावेळी शिक्षण खात्याचे उपमंत्री अहमदनगरचे शंकरराव काळे यांना भेटलो विद्यार्थ्यांची सर्व परिस्थिती त्यांना सांगितली त्यांनी तेथेच अकरावी सुरू करण्याची परवानगी दिली.

वाड्याची आणखीन एक आठवण

विद्यार्थी संख्या खूप वाढली इमारत कमी पडू लागली पाटील सरांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तीन खोल्यांची इमारत आठ दिवसात पूर्ण केली यावेळी ग्रामस्थ विद्यार्थी व विद्यालयाच्या स्कूल कमिटीचा अध्यक्ष अंतू शेट्टी यांनी स्वतः ट्रक चालवून विटा आणण्यास मदत केली. पाटील सरांच्या काळातील आणखीन एक आठवण त्यावेळी संस्थेच्या पुणे रायगड ठाणे शिल्लक शाळातील मुख्याध्यापकांचा व हितचिंतकांचा शैक्षणिक मिळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याचा संपूर्ण खर्च वाडा ग्रामस्थांनी केला होता संस्थेचा अथवा शाळेत एक रुपया खर्च करू दिला नव्हता 1981 च्या जून महिन्यामध्ये पाठी सरांची बदली वडगाव मावळ येथे झाली तेथील विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होत होती तेथील ग्रामस्थ श्री गोखले वकील यांनी स्कूल कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब ढोरे माजी मंत्री मदनलाल बाफना आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने सध्याची वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलची भव्य इमारत उभी केली आहे असे हर होणारी आणि कर्तृत्ववान प्राचार्य 1991 साली आपल्या सेवेतून सेवा मुक्त झाले 1964 ते 2026 पिंपरी येथे वास्तव्यास होते. दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या विदयार्थ्यांने त्यांच्या कार्याचा केलेला अल्प परिचय.

लेखक – प्रा. शहाजी रा. माने

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button