ताज्या घडामोडीपिंपरी
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधव चे तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम गणेश जाधव याने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कास्य पदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केले.
फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया च्या (भारतीय तलवारबाजी संघटना) वतीने १३ वी मिनी आणि ७ व्या चाइल्ड नॅशनल चॅम्पियन २०२५ – २६ चे मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या हस्ते सक्षम गणेश जाधव यास मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचे प्रशिक्षक बोम्मै थिंगबायजम आणि श्वेता मेघाडी उपस्थित होते.
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदु सैनी, उप प्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सक्षम जाधव याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













