ताज्या घडामोडीपिंपरी

“महिला आरक्षणाची दारे शरद पवारांनी उघडली; त्याचा योग्य लाभ घ्या – रोहिणी खडसे”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी प्रदेश पातळीवरून निवडणुकीसाठी कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर कमिटीची दोनच दिवसापूर्वी बैठक संपन्न झाली आणि आज पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला संघटनेचा आढावा घेत निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी कशी आहे याची माहिती घेतली.

महिला आघाडीच्या बैठकीत बोलताना रोहिणी खडसे यांनी सांगितले की, शरद पवार साहेबांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेऊन संधीचे सोने केले पाहिजे. राजकारणात सुरुवातीला महिला पदाधिकाऱ्यांना अडचणी येतातच मात्र या सगळ्यांवर मात करत त्यांनी काम करत राहिले पाहिजे. घराचा उंबरा ओलांडून समाजकार्यासाठी त्यांनी बाहेर पडायला हवे.  कामातील सातत्य हाच राजकीय यशाचा मूलमंत्र आहे.

विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की आपल्या सोबत आणि विरोधात कोण निवडणूक लढणार आहे याचा विचार न करता पक्षातील महिलांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली पाहिजे. त्यातून आपले आपले राजकीय आणि सामाजिक स्थान बळकट होणार आहे.
प्रत्येक प्रभागातून महिलांनी उमेदवारी अर्ज आमच्याकडे केले आहेत. लवकरच कोअर कमिटी समोर सर्व अर्ज आम्ही सादर करणार आहोत *अशी माहिती शहर महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, महिला स्वच्छतागृह, महिला सुरक्षितता इत्यादी महिलांच्या संदर्भातील असंख्य अडचणी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या समोर मांडल्या.
यावेळी शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सोनल पासलकर, भोसरी विधानसभा सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कल्पना घाडगे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष मयुर जाधव, प्रवक्ते माधव पाटील, अरुण पवार, चिंचवड कार्याध्यक्ष सुवर्ण वाळके, पिंपरी कार्याध्यक्ष बबिता बनसोडे, प्रफुल्ला मोतीलिंग व इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button