श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक लॅब माध्यमातून मुंबई येथे झालेल्या रोबोटिक मॉडेल स्पर्धेमध्ये केली अनोखी कामगिरी

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथे इंडिया स्टेम फाउंडेशन च्या वतीने ३ ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या रोबोटिक मॉडेल स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 25 ते 30 रोबोटिक लॅबच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपल्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय चिंचवड पुणे विद्यालयातील
1) पूर्व तामस्कर
2) श्रवण आल्हाट
3) हर्षवर्धन पुजारीया
तीन विद्यार्थ्यांनी मिथेन गॅस चे लिकेज शोधण्यासाठी रोबो कसा मदत करू शकतो या विषयावर सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाची कामगिरी केली.
त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव संस्थेचे सचिव संजयभाऊ जाधव, संचालक विजय जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ, मनीषा जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना कुमारी सिद्धी कारंजकर सौ प्रतिभा साबळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते













