ताज्या घडामोडीपिंपरी
मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांची वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांना भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील कस्पटे वस्तीमध्ये नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी दिवंगत वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत त्यांनी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. परिसरात वैष्णवीच्या अकाली मृत्यूमुळे शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रिटा गुप्ता यांनी या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मनसे या कठीण काळात पीडित कुटुंबाच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच, कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.













