बारावीचा निकाल आज जाहीर होणार

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारावी परीक्षेचा निकाल आज (सोमवार) 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतीत. तसेच सदर माहितीची प्रिंट काढता येईल. त्याचप्रमाणे डिजिलॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवता येणार आहे.
यंदा या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळांतून राज्यभरात 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 8 लाख 21 हजार 450 मुले,तर 6 लाख 92 हजार 424 मुली होत्या. मुंबई विभागात 3 लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी आपला परीक्षा क्रमांक व आईचे नाव अचूकपणे टाकावे. शाळांमार्फत निकालासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून शाळा नोंदणी करून लॉगिन आयडी आणि संकेतशब्दाद्वारे निकाल पाहता येईल.
गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येणार
त्यासाठी 6 ते 20 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यासोबतच शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिका छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पा दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 7 मे पासून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरून घेण्यात येणार आहे.













