ताज्या घडामोडीपिंपरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वरोपासनाच्या विद्यार्थ्यांनी गायले संपूर्ण वंदेमातरम्

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आणि वंदेमातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी वाकड येथे संपूर्ण वंदेमातरम् गीताचे सामुदायिक गायन करून तिरंग्याप्रति आदर व्यक्त केला.

स्वरोपासना म्युझिक अकॅडमीच्या वाकड शाखा क्रमांक एक, शाखा क्रमांक दोन आणि पुनावळे शाखा क्रमांक तीन येथील वय वर्ष तीन ते सत्तर या वयोगटातील विद्यार्थी यासाठी एकत्र जमले होते. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या १८७० च्या दशकातील ‘आनंदमठ’ या कादंबरीतील वंदे मातरम् या गीताने असंख्य देशभक्तांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली. त्यामुळे या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय गीताचा दर्जा बहाल केला. या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अथर्व कुलकर्णी यांनी ते संगीतबद्ध करून यूट्यूबर प्रसारित केले. या निर्मितिप्रक्रियेत अभय – अर्पिता आणि अथर्व – भाग्यदा यांनी योगदान दिले आहे. आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य मुलांच्या ओठांवर सुंदर गाणी आणि विचार देऊन घडू शकते या विचारातून गीत फुलोरा आणि स्वरोपासना तर्फे वंदेमातरम् गायनाचा उपक्रम राबविण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button