ताज्या घडामोडीपिंपरी

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Spread the love

“जग बदल घालूनी घाव” या ब्रीदाने प्रेरित होऊन अण्णाभाऊंना अभिवादन!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शोषित, वंचित, पीडित आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लेखणी आणि समाजकार्याच्या माध्यमातून आयुष्यभर लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथे करण्यात आले.

या कार्यक्रमात रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी मंचाचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, योगेश कांबळे, प्रगती कोपरे, प्रणाली कावरे, अतुल वाघमारे, प्रा. विक्रांत शेळके, अभिषेक चक्रनारायण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अ‍ॅड. धम्मराज साळवे यांनी सांगितले,

“शोषित, वंचित, पीडितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याला आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन ‘जग बदल घालूनी घाव’ हे ब्रीद आम्ही अंगीकारले आहे आणि त्याच मार्गावर आमचा लढा सुरू आहे.”

कार्यक्रमादरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी योगदानाची आठवण करून देत त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असून, युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी ही चळवळ कार्यरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button