ताज्या घडामोडीपिंपरी
माता रमाई स्मारकासाठी आरक्षित जागा वाचवा – अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – रविराज काळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील जागा ही अनेक वर्षांपासून माता रमाई यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात आली होती. ही जागा समाजाच्या ऐतिहासिक स्मृती आणि श्रद्धेचा भाग आहे. मात्र, अलीकडे महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे या जागेवरील ‘माता रमाई स्मारकासाठीचे आरक्षण रद्द करून, तेथे पोलिस स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे.
हा निर्णय समाजाच्या भावना आणि इतिहासाचा घोर अपमान असून, या विरोधात आम आदमी पार्टीने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.शहराध्यक्ष रविराज काळे यांनी म्हटलं आहे की,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह माता रमाई यांचे स्मरण हे केवळ एक स्मारक नाही,तर एका क्रांतीचा, त्यागाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा सन्मान आहे.
प्रशासनाने जर लवकरात लवकर हा चुकीचा निर्णय मागे घेतला नाही,तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू!”
माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचं आधारस्तंभ होत्या.समाजसुधारणेच्या कार्यात त्यांनी प्रभावी साथ दिली.आजही अनेक महिलांसाठी त्या प्रेरणा ठरतात.
या पार्श्वभूमीवर, त्यांचं स्मारक उभं करणं ही इतिहासाची आणि कृतज्ञतेची जबाबदारी आहे.
त्या ऐवजी पोलिस स्टेशनसारख्या निर्णय ही संवेदनशीलतेच्या पूर्णपणे विरुद्ध बाब आहे.
आम आदमी पार्टीची स्पष्ट मागणी:
तातडीने पूर्वीचं स्मारकासाठीचं आरक्षण पुन्हा लागू करावं.
समाजाच्या भावना दुर्लक्षित करणारे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत.या विषयावर खुली चर्चा करून जनतेच्या भावना जाणून घ्याव्यात.
जर प्रशासनाने या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन उभारेल.हा लढा केवळ जागेसाठी नसून, स्मृती, सन्मान आणि स्वाभिमानासाठीचा आहे.












