ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना किवळे आर्थिक दुर्बल प्रकल्पातील सदनिका उपलब्ध

रावेत प्रकल्पातील लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रावेत प्रधानमंत्री आवास योजनेतील निवड यादी व प्रतीक्षा यादी १ व २ मधील लाभार्थ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” त्या तत्वावर किवळे येथील आर्थिक दुर्बल

प्रकल्पातील सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने करण्यात आले आहे.
किवळे येथील प्रकल्पाअंतर्गत एकूण ७५५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर वाटप करण्यात येणार आहेत. सदनिकेची किंमत ₹13,00,718/- इतकी निश्चित करण्यात आली आहे.या प्रकल्पांमध्ये सदनिकेचा लाभ घेऊ रावेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड व प्रतीक्षा यादीतील इच्छुक अर्जदारांनी ०९ मे २०२५ पर्यंत खालील कागदपत्रांसह संमतीपत्र सादर करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच किवळे येथील सदनिकांचे वाटप करण्यात येईल. तसेच, सदनिकेच्या हस्तांतरणासंबंधी अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडे राहणार आहेत.

आवश्यक कागदपत्रांची यादी:
आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)

पॅन कार्ड (अर्जदार व सह-अर्जदार)

जातीचा दाखला (अर्जदार)

मतदान ओळखपत्र

बँक पासबुक

चालू महिन्याचे वीज बिल

उत्पन्नाचा दाखला (2024-25) / ITR / फॉर्म १६

अधिवास प्रमाणपत्र

भाडे करारनामा किंवा संमतीपत्र (ज्यांना स्वत:ची जागा नाही)

दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण:
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग,
२०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी, चिंचवडगाव, पुणे – ४११०३३
वेळ: सकाळी १०.३० ते सायं. ५.००

किवळे येथील सदनिका मिळविण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनास बळी पडू नये.ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी संमतीपत्राचा नमुना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून घेवून जावा व कागदपत्रांसह सादर करावा.
– अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button