ताज्या घडामोडीपिंपरी

रावेत गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा देऊ – आयुक्त शेखर सिंह

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी सकारात्मक चर्चा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू नागरिकांसाठी, कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करण्यात यावी. रावेत येथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे ६ लाख ९५ हजार रु. किमतीत किवळे गृहप्रकल्पात घरे देण्यात यावीत, लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना २.० अन्वये लाभ देण्यात यावे या मागण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी लवकरच गृह प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रावेत प्रकल्पातील लाभार्थींची स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासित केले.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळात कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, नरसिंग माने, अमृत पाटील, संदीप कांबळे उपस्थित होते.

कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे याबाबत महानगरपालिकेवर नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. महासंघाचे चर्चेत पिंपरी चिंचवड हि उद्योगनगरी, कामगारनगरी असून येथे घरांसाठी गरजू असणाऱ्या नागरिकांची, कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण एखाद्या गृहप्रकल्पाची जाहिरात दिल्यानंतर त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या ५० ते ६० हजार इतकी मोठ्या प्रमाणात असते म्हणजे अल्प दरातील घरांची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे हे यातून निदर्शनास येत आहे. महानगरपालिकेकडून आता १० हजारापेक्षा अधिक घरांच्या निर्मिती करण्यात यावी अशी चर्चा केली .

ऑगस्ट २०२० मध्ये महानगरपालिकेकडून रावेत येथे गृहप्रकल्प करण्यात येणार म्हणून नागरिकाकडून अर्ज मागविण्यात आले आणि ९३४ लाभार्थी निश्चित करण्यात आले. मात्र ५ वर्षे झाले तरी हा प्रकल्प झाला नाही आता महानगरपालिका याच लाभार्थ्यांना याच किमतीत घरे न देता केवळ येथील प्रकल्पामध्ये १३ लाख रुपये किमतीमध्ये घरे देणार आहे हे अन्यायकारक असून सदर लाभार्थ्यांमध्ये रिक्षाचालक, कामगार, फेरीवाला, मजूर असे सामान्य कुटुंबातील लाभार्थी आहेत त्यांना इतका दर परवडणारा नाही म्हणून दर कमी करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली असता परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीबाबत आम्ही काम करत असून त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर रावेत प्रकल्पातील लाभार्थी यांना शक्य तितके मदत करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button