रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराच्या वतीने आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे विजयी संकल्प मेळावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे ‘विजयी संकल्प मेळावा’ या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, सायं. ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे, भीमसृष्टी पिंपरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री डॉ. रामदास आठवले यांची उपस्थिती हा मेळावा होणार आहे.शहरातील आरपीआयच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी व आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, आमदार अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तसेच शहरातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी व युवक नेते देखील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्याचे निमंत्रक कुणाल व्हावळकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“चला पिंपरी, चलो पिंपरी” या घोषणेसह आरपीआयच्या विजयाचा संकल्प घेण्यासाठी हा मेळावा भव्यतेने पार पडणार आहे.




















