कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानतर्फे १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘सुरमयी दिवाळी पहाट’चे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार यांच्या वतीने येत्या १९, २०, २१ व २२ ऑक्टोबर रोजी ‘सुरमयी दिवाळी पहाट’ अंतर्गत संगीत, गाण्यांची मैफिल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नांदेकर यांच्या हस्ते होणार आहे.
दि. १९ ऑक्टोबर रोजी सूरपालवी अंतर्गत गायिका पल्लवी पत्की-ढोले, झी मराठी, अवघा रंग एक झाला फेम संदीप चाबुकस्वार, गायक आकाश सोळंकी, गायिका जयश्री करंबेळकर – ठाणेकर यांचे गायन होणार आहे. निवेदन योगेश सुपेकर करणार आहेत.
दि. २० ऑक्टोबर रोजी श्री. तिथं सौ. ही तरुणाईला भुलविणारी किस्से कविता गाण्यांची अनोखी मैफील होणार असून, गायिका मधुरा परांजपे, गायक स्वप्नील गोडबोले, गायिका चेतना भट, गायक मंदार चोळकर यांचा सहभाग असणार आहे. अमीर हडकर संगीत संयोजन करणार आहेत.
दि. २१ ऑक्टोबर रोजी ‘संतवाणी ते लोकगीते व लावणी’ अंतर्गत स्वरसम्राट कै. प्रल्हाद शिंदे यांचे सुपूत्र चंद्रकांत शिंदे, मी होणार सुपरस्टार फेम गायिका वर्षा एखंडे, सारेगम फेम पार्श्वगायिका राजेश्वरी पवार यांचे गायन होईल. तर संगीतकार चित्रसेन भवार निवेदन करतील.
दि. २२ ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी संगीतमय धमाका’ अंतर्गत पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, व्हर्सेंटाईल सिंगर ममता नेने – गोगटे, पार्श्वगायक संतोष माहेश्वरी, पार्श्वगायिका रोहिणी पांचाळ, पार्श्वगायक नितीन कदम यांचे गायन होणार आहे.
दिवाळी पहाटच्या सुरमयी गाण्यांचा रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.













