रहाटणी प्रभाग २७ मधील रखडलेले गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण; महिलांना रक्षाबंधनाची खास भेट

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेली अनेक वर्षे रखडलेले महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईनचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. हे महत्त्वाचे काम आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व आप्पा तांबे यांच्या विशेष पुढाकाराने मार्गी लागले. रहाटणीतील के.के. अंजना सोसायटी येथे या गॅस पाईपलाईनचे उद्घाटन रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले, ज्यामध्ये महिलांना खास भेट दिली गेली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, सभासद आणि आप्पा तांबे उपस्थित होते. स्थानिक महिलांनीही यावेळी समाधान व्यक्त केले.
मात्र, काम सुरू असताना काही अल्पसंख्य लोकांनी अडथळा निर्माण करत काम थांबवण्याचा प्रयत्न केला. पायवाटीवर काम होत असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी विरोध दर्शवला. हेच लोक मागील पाच वर्षात कधीही महापालिकेत पत्र देत नाहीत, स्वतःच्या दारासमोरील रस्ताही त्यांनी बनवला नाही, अशी तीव्र टीका आप्पा तांबे समर्थकांनी केली.
या विरोधकांवर आरोप करण्यात आला की ते इतरांच्या कार्यक्रमात फक्त फोटोसाठी सहभागी होतात व स्वतः कधीच काही काम करत नाहीत. याशिवाय, काम बंद पाडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांचे नेहमीचे धोरण असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
आप्पा तांबे यांनी यावेळी सांगितले की, “आम्ही निवडणुकीच्या उद्देशाने काम करत नाही. लोकहिताचे काम घेतल्यावर ते १००% पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटत नाही.”








