पुनावळे बंधारा परिसरात अज्ञात व्यक्तींनी टाकली जनावरांची कातडी

पुनावळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना नदीवरीलमहत्वाच्या असलेल्या पुनावळे बंधारा परिसरात अज्ञात व्यक्तींनी जनावरांची कातडी आणून टाकल्याचे मंगळवारी (ता. ९) पहाटे उघडकीस आले. पर्यावरण तसेच आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दक्ष नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप संतप्त स्थानिकांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षांपुर्वीही असे प्रकार उघघडकीस आले होते. त्याबाबत महापालिका प्रशासनाला कळवूनही
कारवाई होत नाही. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडतात आणि नदीप्रदुषण वाढते,असा आरोप नागरिकांनी केला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीत
पुनावळे, वाल्हेकरवाडी भागातून येणारे नाले मिसळतात. नदीत जलपर्णी वाढलीआहे. बंधाऱ्यावर कपडे, गाड्या धुतल्या जातात. त्यामुळे पिण्यासाठी उपसा केले जाणारे पाणी अशुद्ध होते.
पुनावळे बंधारा परिसरात जनावरांची कातडी, चरबी
टाकण्याचे प्रकार सतत घडत आहेत. शहरासाठी येथूनच पिण्याच्या पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची
दाट शक्यता आहे.
– राहुल काटे, पुनावळे
नाल्याचे तसेच महापालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाणी नदी पात्रात जाते. त्यामुळे पवना नदीची अवस्था गटारासारखी झाली आहे.
बंधाऱ्यात मिसळणारे अशुद्ध पाणी, नदीपात्रातून जाणाऱ्या नाल्यांमधील गढूळ पाणी तत्काळ बंद करावी, अशी मागणी अनेकांनी केली.
जनावरांची कातडी टाकण्याचा प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेने कडक उपाय योजावेत, अशी मागणीही स्थानिकांनी केली. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभाग
प्रमुखांशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी
प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.




















