“प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करण्याची धमक म्हणजे खरे शिक्षण होय” गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग कला संस्थेने ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा व महिलांचा गौरव सोहळा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड येथील संभाजीनगरमधील साई उद्यानात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला नागरिकांनी विद्यार्थांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. गणेश शिंदे यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. त्यांनी सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांच्या प्रभावी विचारामुळे उपस्थितांना चांगलाच आनंद झाला.
यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ४२८ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक प्रोत्साहन निर्माण होईल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.
तसेच, समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या ४६ पेक्षा जास्त महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महिलांनी सामाजिक कार्यात अधिक सक्रिय व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा या गौरव सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून श्रीमती अनुराधाताई गोरखे या उमेदवार असतील, अशी घोषणा केली. या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, “हा गौरव सोहळा म्हणजे समाजप्रबोधन, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण यांचा संगम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने त्यांना प्रेरणा मिळते. तसेच,महिलांचा गौरव करून कलारंग संस्थेने स्त्रीशक्तीचा सन्मान केला, याचा मला आनंद वाटतो. अशा कार्यक्रमांमधून समाजात चांगले विचार आणि एकतेचा संदेश पोहोचतो.”
तसेच माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ सोहळा नसून, समाजातील सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांना आणि महिलांना प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हा सन्मान माझ्यासाठी समाजाचे प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे.”*
हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पारपडला महिला, विद्यार्थी, पालक आणि जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, भाजप अध्यक्ष शत्रुघ्न काटे, कामगार नेते इरफान भाई सय्यद, उद्योजक उमेश चांदगुडे, भाजप अनुसूचित मोर्चा अध्यक्ष बापू घोलप, तसेच मोरेश्वर शेडगे, वैशाली खाडे, केशव घोळवे, सुप्रिया चांदगुडे, शर्मिला बाबर, कमल ताई घोलप, कुशाग्र कदम, योगेश बाबर, अमित बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, कैलास कुटे, राजू दुर्गे, गणेश लंगोटे, मनीषा शिंदे, नेताजी शिंदे, धरम वाघमारे, बाळासाहेब रसाळ, नारायण बहिरवाडे, प्रशांत शितोळे, शीतल शिंदे, उत्तम केंदळे, दिलीप दातार पाटील, खेमराज काळे, अतुल इनामदार, नाना काळभोर, सुजाताई पलांडे, आणि राजेश पिल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.














