प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अनोखी गणेश सजावट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज झाली आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज यांनी क्विक हील फाउंडेशन व सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती अभियान सुरू केले आहे.
या अभियानात प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गणपती सजावटीतून सायबर सुरक्षेचे संदेश देत जनजागृती केली. हार, दुर्वा, तोरण, सायबर गीता अशा नाविन्यपूर्ण वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करून शासकीय रुग्णालये, पोलीस ठाणे, झोपडपट्टी विभाग तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमातून नागरिकांना फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी, लिंक, कॉल व ईमेलमधील धोके याविषयी माहिती देण्यात आली.
या जनजागृती मोहिमेत प्रकल्प समन्वयक डॉ. हर्षिता वाच्छानी, क्विक हील सीएसआर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर, दिपू सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य झाले.
क्लब ऑफिसर्स म्हणून श्रावणी सावंत (प्रेसिडेंट), आकाश ठाकूर (सेक्रेटरी), ऑलिव वर्गीस (अॅक्टिव्हिटी डायरेक्टर), मानसी वाडेकर (मीडिया डायरेक्टर) हे कार्यरत आहेत. तर विद्यार्थी संस्कृती, ओम, अनुष्का, राजीव, पियुषा, मयांक, रिषभ, जाईल, बेंजामिन, सिमरन, रोनित, दुर्वा, गायत्री, फैसल, स्नेहा, साकिब आदी सायबर वॉरियर्स म्हणून कार्यरत आहे.















