चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) चे आव्हान टाळण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सिद्ध करावे : आयुर्वेदाचार्य डॉ .शैलेश गुजर

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावरती शिक्षण तज्ञ धनंजय कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया , संस्थेच्या खजिनदार डॉ .भूपाली शहा, संचालिका डॉ तेजल शहा, प्राचार्या डॉ . क्षितिजा गांधी, डॉ .पौर्णिमा कदम, डॉ. वनिता कुऱ्हाडे, वृंन्दा जोशी, एमबीएचे संचालक डॉ सचिन बोरगावे , आदी उपस्थित होते. डॉ शैलेश गुजर, डॉ . दीपक शहा , डॉ भूपाली शहा यांच्या हस्ते नुकतेच पीएचडी मिळविलेले डॉ रोहित आकोलकर, डॉ . शबाना शेख तसेच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रा. प्रीती जगताप, प्रा. रूपाली नानकर समवेत उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन शिक्षक दिनानिमित्त सर्वांचा गौरव करण्यात आला. प्रमुख व्याख्यात्याचा सत्कार डॉ दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला.

मार्गदर्शन करताना डॉ. शैलेश गुजर पुढे म्हणाले, शिक्षक बुद्धी, सामर्थ्याच्या विचार करून नवनवीन गोष्टीचे ज्ञान देत असतो. पुढील काळात शाळा व महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आई ) चे तंत्रज्ञान येऊ पाहत आहे .भविष्यात प्राध्यापक व शिक्षकांची जागा रोबोट्स घेतील का ? हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे जे शिक्षक स्वतःला सिद्ध करू शकतील, तेच भावी काळात टिकू शकतील. यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास, संशोधन करावे. स्वतःला झोकून दिले तरच, टिकाव धरू शकाल असे मत यावेळी व्यक्त केले .
शिक्षण तज्ञ धनंजय कदम यांनी केंब्रिज चे कोर्स, इंग्रजी भाषेचे महत्व, आजच्या काळातील गरज याबाबत सखोल मार्गदर्शन करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक डॉ दीपक शहा म्हणाले , शिक्षक दिन एक दिवस साजरा न करता वर्षाचे 365 दिवस साजरा करण्यात यावा .अल्पावधीतच प्रतिभा महाविद्यालयाने शहरात नावलौकिक मिळविला. याचे यश येथील प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे यश आहे. असे मी मानतो. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर बाहेरील जगाची अद्ययावत माहिती मिळावी, तसेच त्याना गुणात्मक शिक्षण द्यावे असा सूचना यावेळी डॉ . शहा यानी दिल्या.
शिक्षक दिनानिमित्त प्रतिभा महाविद्यालयात आज सकाळी 80 विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पडली व वर्गात जाऊन विद्यार्थाची तासिका घेतली. प्राचार्याची भूमिका तबस्सूम शेख या विद्यार्थिनींनी पार पाडली .त्यांच्या सत्कार मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, डॉ. जयश्री मुळे , आदीनी करून त्याना मार्गदर्शन केले.

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. प्राचार्या वृंदा जोशी, उपमुख्याध्यापिका लीजा सोजू, शिक्षिका गुलनाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा अमोल शिंदे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button