ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी – प्रकाश क्षीरसागर

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना भाजपतर्फे आदरांजली; “एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नही चलेंगे" या ऐतिहासिक घोषणेचे स्मरण

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डॉ. मुखर्जींनी देशाच्या एकात्मतेसाठी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान हे राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. ‘एक देश, एक विधान, एक निशान व एक प्रधान’ या त्यांच्या घोषणेने तत्कालीन परिस्थितीत देशाची एकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, जे आजही राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश श्रीरसागर यांनी केले.

जनसंघाचे संस्थापक, महान देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भाजपतर्फे डॉ. मुखर्जींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदराने स्मरण करण्यात आले. मोरवाडी, पिंपरी येथील भाजपा कार्यालयात उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुखर्जींच्या विचारांना आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीला नमन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी, डॉ. मुखर्जी यांच्या देशकार्यावरील माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रकाश क्षीरसागर यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचे शिक्षण, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून केलेले कार्य, स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे योगदान आणि जनसंघाची स्थापना यावर सविस्तर माहिती दिली. काश्मीरच्या एकात्मतेसाठी त्यांनी पुकारलेला संघर्ष आणि त्यासाठी दिलेले बलिदान हे त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक होते, असे यावेळी आवर्जून नमूद केले. ‘एक देश, एक विधान, एक निशान’ या त्यांच्या घोषणेने तत्कालीन परिस्थितीत देशाची एकता टिकवण्यासाठी कसे महत्त्वाचे कार्य केले, यावरही प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, कार्यक्रमाचे संयोजक मोरेश्वर शेडगे, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिंल्ले, माऊली थोरात, सरचिटणीस शितल ऊर्फ विजय शिंदे, अजय पाताडे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, योगिता नागरगोजे, मनोज तोरडमल, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, वैशाली खाडये, अर्जुन ठाकरे, खंडूदेव कथोरे, देवदत्त लांडे, बिभीषण चौधरी, विठठल भोईर, कैलास सानप, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, हर्षद नढे, गणेश ढोरे, धरम वाघमारे, मंगेश धाडगे, अनिता वाळुंजकर, रामदास कुटे, शिवराज लांडगे, अमोल डोळस, अजित बुर्डे, बबन कांबळे, गोरक्षनाथ झोळ, रवी देशपांडे, सीमा चव्हाण, प्रमोद ब्राम्हणकर, गणेश आर. ढाकणे, संतोष टोणगे, नेताजी शिंदे, दिनेश यादव, महेंद्र बाविस्कर, दिपक भंडारी, दत्ता झुळूक, दत्ता ढगे, सुनील लांडगे, संतोष तापकीर, दत्ता तापकीर, मनिषा शिंदे, रामदास काळजे, गणेश लंगोटे, अभिजीत बोरसे, सचिन राऊत, दीपक नागरगोजे, उदय गायकवाड, राजू मासूळकर, अमेय देशपांडे, संजय परळीकर आदी उपस्थित होते.

उपस्थितांनी डॉ. मुखर्जींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे नव्या पिढीला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या देशसेवेची आणि त्यागाची माहिती मिळाली, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर शेडगे यांनी केले. सुत्रसंचालन अजय पाताडे यांनी तर आभार विजय फुगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button