ताज्या घडामोडीपिंपरी
दापोडी येथील प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षक दिनाच्या औचित्याने प्रबोधन प्रतिष्ठान, दापोडी, पुणे यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या ऐतिहासिक ग्रंथाचे पुस्तक देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास सिटी प्राईड इंग्लिश स्कूल रहाटणीचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, प्रा. सिध्दार्थ कांबळे (सि.के. गोयळ कॉलेज, दापोडी), ॲड. महेश लोहारे (संचालक आर.आय.बी. संस्था, पिंपरी-पुणे), पत्रकार यशपाल सोनकांबळे, प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रा. गोरख ब्राह्मणे, तसेच रायगड भूषण संपादक डॉ. रविंद्र विष्णू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.













