ताज्या घडामोडीपिंपरी
पोपट आरणे यांची अनुसूचित जाती विभागाच्या शहर काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील घरकुल वसाहतीतील सामाजिक कार्यकर्ते पोपट आरणे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या शहर सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती हिरामण खवळे यांच्या हस्ते करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी आणि कार्यतत्परतेसाठी ओळखले जाणारे पोपट आरणे यांनी या नियुक्तीनंतर पक्षाच्या सर्व घटकांना न्याय देत, काँग्रेस पक्षाच्या धोरणांनुसार प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आरणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

















