ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपळे निलखमध्ये उभी राहणार पोलिस चौकी -आपचे रविराज काळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या त्यामुळे गुन्हेगारीच प्रमाण वाढलं , भांडण, मारा – मारी,चोरी , छेडछाड या सारख्या अनेक गोष्टीमुळे पिंपळे निलख वासिय त्रस्त झाले होते. आणि हेच हेरून इथे पोलीस चौकी व्हावी असा निर्धार रविराज काळे यांनी केला पण प्रशासनाची उदासीनता आडवी येत होती पण अखेर रविराज काळे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आणि पोलिस चौकी होण्यासाठीचा मार्ग सुकर झाला.
या वेळी रविराज काळे म्हणाले हे यश माझं नाही तर सामान्य नागरिकांचं आहे ज्या ज्या वेळी तुमच्या हक्काचा प्रश्न येईल त्या त्या वेळी मी रस्त्यावर उतरेन ही पोलिस चौकी झाल्यावर नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









