ज्येष्ठांच्या समस्येसाठी पोलिस यंत्रणा सदैव तत्पर- सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आजच्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक उपेक्षित घटकात मोडत असल्याचे विदारक चित्र आहे .त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या , अडचणी , त्यांना होणारा त्रास पाहता पोलिस यंत्रणा सदैव तत्पर असल्याचे चिंचवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दत्तात्रेय
गुळीग यांनी प्रतिपादन केले .
काळभोरनगर येथील नवनिर्वाचित जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेमध्ये गुळीग पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त यांच्या कल्पकतेतून ज्येष्ठांसाठी ॲप तयार केला असून त्याद्वारे ज्येष्ठांना तात्काळ मदत मिळेल.
ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक विशाल बाळासाहेब काळभोर यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा तरुणाईसाठी करून युवा पिढीला मार्गदर्शन करावे . तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे बाबत आश्वासन दिले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खंडेराव काळे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून कमलताई धाईंजे होत्या .
यावेळी , पोलिस हवालदार भरत धोंडे , दिनेश सकटे तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर काळभोर , मधुकर काळभोर , हनुमंत पोळ , रमेश मेमजादे , रवींद्र मांजरेकर व कल्पना घाडगे इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे नियोजन गोविंद देशमुख व लावण्या पोटघन यांनी केले तर प्रकाश परदेशी यांनी सूत्रसंचालन आणि सचिन मोकाशी यांनी आभार व्यक्त केले .













