ताज्या घडामोडीपिंपरी

पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अतिवृष्टीसह उद्भवणाऱ्या इतर आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीला तोंड देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज आहे. नागर‍िकांनीही अशा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठ‍िकाणी जावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात संबंध‍ितांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पीएमआरडीएचे प्र. महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी यंत्रणेला दिले आहेत.

हवामान विभागाकडून वेळोवेळी मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही आहे. अतिवृष्टीसह आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए अत्याधुनिक यंत्रणेसह सतर्क आहे. संबंध‍ित अधिकाऱ्यांनी आवशकतेनुसार इतर यंत्रणांच्या संपर्कात राहून आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत संबंध‍ितांपर्यंत तातडीने मदतकार्य कसे पोहोचव‍िण्याचे याची काळजी घेण्याचे न‍िर्देश प्र. महानगर आयुक्त यांनी द‍िले आहे. यासह नागर‍िकांनी सुद्धा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये, तसेच शासनांच्या सूचनांचे पालन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक
पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) : 9545282930
मारुंजी अग्निशमन विभाग : 020 – 67992101, 020 – 67992100, 7066055101
नांदेड सिटी अग्निशमन विभाग : 020 – 67520002, 020 – 67520001
वाघोली अग्निशमन विभाग : 020 – 29518101, 020 – 29519101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button