पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांची नियमित बदली अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयातील बार रूम येथे पार पडला.
पिंपरी न्यायालयात तीन वर्षे ११ महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून पिंपरी न्यायालयात काम करीत असताना सर्व वकिलांनी सहकार्य केले याबद्दल ॲड. सीमा शेख यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. गिरीष बारगाजे, ॲड. क्रांती कुरळे, ॲड. पूजा इंगळे, ॲड. सुरज मोहिते, ॲड. रूपाली साखरकर, ॲड. प्राजक्ता पिसाळ यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे ॲड. अतिष लांडगे, बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुजाता बिडकर, ॲड. सारिका परदेशी, ॲड. तारा नायर, ॲड. चित्रा फुगे, ॲड. आस्मा मुजावर, ॲड. अतुल कांबळे, ॲड. सुषमा बोरसे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. शंकर पिल्ले, ॲड. योगेश माळेवाडी व वकील बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे, मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, सदस्य ॲड. संकेत सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमेश खंदारे यांनी तर आभार ॲड. संकेत सरोदे यांनी मानले.













