ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी कॅम्प मध्ये पोलीसगस्त वाढवा, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या – श्रीचंद आसवानी

पिंपरी कॅम्प मध्ये पोलीसगस्त वाढवा, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या - श्रीचंद आसवानी

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या की संपर्क करणे सोपे होते. यापूर्वी या पोलीस चौकीमध्ये देखील तक्रार नोंद करून घेतली जात होती ते आता होत नाही. बाजारपेठेपासून पिंपरी पोलीस स्टेशन हे पुणे मुंबई महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर लांब आहे. तेथे तक्रार नोंद करायला गेलो की तेथील ठाणे अंमलदार नोंद करून घेण्याऐवजी तक्रार करण्यास केलेल्या व्यापाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. पथारी टाकून बसलेल्यांना हटवण्या ऐवजी त्यांनाच संरक्षण देऊन पोलीस दुकानदार, व्यापाऱ्यांना त्रास देतात. मागील आठवड्यात पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशा मागण्या करीत पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी (दि. ७) बाजारपेठ बंद ठेऊन पोलिसांचा निषेध केला.
अशा मागणीचे पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, नीरज चावला, सुनील चुगाणी, प्रकाश रतनाणी, सचिन तलरेजा, अमर कुकरेजा
यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button