Spread the love

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्पमधील तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील झाड व्यावसायिकांनी १५-२० दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात मुळासकट तोडले. नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर परिसरात तीव्र संताप पसरला आहे. झाडाचे उरलेले खोड कापडी पोत्याने झाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.  युवा नेते  सुहास कुदळे यांनी दोषींवर “महाराष्ट्र (नगरपालिका क्षेत्रांतील) वृक्षतोड प्रतिबंधक कायदा, १९६४” नुसार कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पिंपरी कॅम्पमधील तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील एक जुने व मोठे झाड काही व्यावसायिकांनी सुमारे १५-२० दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात मुळासकट तोडले. ही घटना सुरुवातीला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर परिसरात तीव्र संताप पसरला आहे.

विशेष म्हणजे, झाडाच्या उरलेल्या खोडावर कापडी पोते बांधून त्याला झाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यामुळे संबंधित व्यापाऱ्यांचा हेतू उघड झाला असून त्यांनी मुद्दाम झाडाची तोड केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, दोषींवर “महाराष्ट्र (नगरपालिका क्षेत्रांतील) वृक्षतोड प्रतिबंधक कायदा, १९६४” नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

या प्रकारामुळे उद्यान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, झाडतोड थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version