ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी कॅम्पमध्ये वाहतुकीला दिलासा, ४० फूट रस्ता रुंद होणार

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील पिंपरी कॅम्प भागातील व्यापारी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका रस्ता रुंदीकरण करणार असल्याचे निदर्शनास आले. पिंपरी येथील व्यापारी संघटनांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी संपर्क साधला. तत्पर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यापारी संघटनांशी पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज असवानी यांच्या कार्यालयात एक बैठक घेऊन व्यापारी आणि नागरिक यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक बोलावली.

या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापालिकेचे उपसंचालक नगर रचना प्रताप गायकवाड ,शहर अभियंता मकरंद निकम व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष धनराज  आसवांनी,जितु ममतांनी, गुलाबचंद आसवांनी, जयेश चौधरी,अमर बजाज, संतोष यादव, विनोद भोजवानी आणि इतर व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्ये उपस्थित होते या बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४० ( चाळीस ) फुट रस्ता रुंदीकरण करणार.साधारण एक महिन्याच्या आत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होईल असे मनपा अधिकारी यांनी सांगितले.

रस्ता रुंदीकरण होत असताना कोणत्याही धार्मिक स्थळांना बाधा होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे, आश्वासन अधिकारी यांनी दिले.या वेळी अजून एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी आणि रहिवासी नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे करण्यात आली.

या वेळी विद्युत नियोजन समितीकडे वारंवार तक्रार अर्ज करित असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गुलाबचंद आसवांनी यांनी लक्षात आणून दिले.त्या वर विद्युत कार्यकारी अभियंता मुंडे साहेब यांनी या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अंदाजे ५ ( पाच कोटी ) रुपये खर्च येणार असून तसा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे सादर केला.

यावेळी उपस्थित असलेल्या व्यापारी आणि नागरिक यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष धनराज आसवांनी यांचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button