पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आज तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधूनआयोजन करण्यात आले होते.गेल्या 13 वर्षांपासून शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेतला जात असून शिवलीलामृत ग्रंथ पारायणमध्ये परिसरातील असंख्य महिला भगिनी सहभागी झालेल्या होत्या.
या प्रसंगी ग्रंथांचे पुजन व दीपप्रज्वलन माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते करून या पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शिवलीलामृत ग्रंथ पारायणमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत करून मनाच्या शांततेसाठी अशा पारमार्थिक कार्यक्रमाचे आयोजन खूप महत्वाचे आहे असे सांगितले.
याप्रसंगी शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर तथा माऊली हांडे,ह.भ.प. विलास काटे ,शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल मुरलीधर काटे तसेच नंदकुमार काटे, चंद्रकांत सुलाब काटे, राजू टकले, जयसिंग चव्हाण, व्यासपीठ चालक झोपे यांच्यासहित परिसरातील माता भगिनी,शंभु भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.








