ताज्या घडामोडीपिंपरी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध; मृतांना श्रद्धांजली अर्पण

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांना भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. बुधवारी, सकाळी पिंपरी येथील मोरवाडी येथील भाजपा कार्यालय परीसरात या घटनेचा निषेध नोंदवून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आमदार तथा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यात पुण्यातील नागरिकांचाही समावेश होता. या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी नावे विचारून हिंदू नागरिकांची हत्या केली, हे अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकार या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर देईल”, असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, शीतल शिंदे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, महेश कुलकर्णी, मनोज तोरडमल, तेजस्वीनी कदम, अजित कुलथे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, वैशाली खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, हर्षल नढे, सनी बारणे, मंगेश धाडगे, अमोल डोळस, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, विठ्ठल भोईर, कैलास सानप, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, अमेय देशपांडे, रवींद्र देशपांडे, भूषण जोशी, नंदू कदम, देवदत्त लांडे, दीपक नागरगोजे, संतोष भालेराव, संतोष तापकीर, समीर जावळकर, राजेंद्र ढवळे, अंतरा देशपांडे, युवराज ढोरे, शिवम डांगे, आदित्य रेवतकर, जयश्री मकवाना, वंदना आल्हाट, प्रतिभा जवळकर, आरती सोनावणे, दिपाली कलापुरे, संतोष जाधव, हिरामण आल्हाट, संतोष भालेराव, गोरख पाटील, अभिजित बोरसे, युवराज लांडे, सागर घोरपडे, नंदू भोगले, खंडू कथोरे, दत्ता ढगे, गीता महेंद्रू, राजश्री जायभाय, किरण पाटील, सागर देसाई, शुभम विचारे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button