पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील औद्योगिक आस्थापनांना महापालिकेकडून येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत औद्योगिक व लघुउद्योगांसमोरील तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
विधानभवनात पिंपरी चिंचवड लघुउद्योजक यांच्या विविध समस्या बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, पिपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे, महापारेषानचे अधिकारी व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, महापालिकेकडून विविध उद्योजकांना देण्यात आलेल्या LBT च्या नोटिसांचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. तसेच lBT थकलेल्या उद्योजकाना भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, असे निर्देश पिपरी-चिंचवड महापालिकेला श्री. बनसोडे यांनी दिले.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, टी-२०१ पुनर्वसन प्रकल्पाला गती देण्यात यावी. १९९२ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २५ वर्षांनंतरही गाळे वाटपाच्या प्रक्रियेत अडकला आहे. २००६ मध्ये १४४ उद्योजकांनी प्रत्येकी ३० हजार रुपये भरले होते. सुरुवातीला गाळ्याचा दर १००० रुपये प्रति चौ.फुट असताना सध्या पालिकेने तो ५६०० रुपये केला आहे. हा दर उद्योजकांना परवडणारा नसल्याने १७८४ रुपये दराने गाळे विकावेत किंवा ६-७ रुपये दराने भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. गाळे वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी, असे निर्देश उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी दिले.
औद्योगिक परिसरातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेऊन तातडीने डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे. पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणेकरीता सामुहीक सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघू उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर सीईटीपी उभारण्याच्या कामाला गती द्यावी.
बैठकीत यावेळी औद्योगिक परिसरातील घनकचरा, घातक कचरा विल्हेवाट लावणे बाबत, बंद पथदिवे अनधिकृत भंगारची दुकाने, औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा आधी विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांना प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदरील बैठकीस पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांचे खालील मान्यवर उपस्थितीत होते.
संदीप बेलसरे (अध्यक्ष), जयंत फड (सचिव), संजय जगताप (उपाध्यक्ष), नवनाथ वायाळ (संचालक), संजय सातव (संचालक) व भारत नरवडे (संचालक).















