ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्या लढतीत ‘डिपॉझिट जप्त’चा पाऊस

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी उतरलेल्या एकूण ६९२ उमेदवारांपैकी तब्बल ६१ टक्के, म्हणजे ४२३ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. केवळ २६९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले. निवडणुकीत अनेक पक्षांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शहरात भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने उभे केलेल्या १२३ पैकी एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) यांनीही प्रभावी कामगिरी करत १२० पैकी ११९ उमेदवारांचे डिपॉझिट वाचवले, तर केवळ एका उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.

शिंदेसेनेने ५८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले, तर ४३ उमेदवारांचे जप्त झाले. दुसरीकडे, उद्धवसेना आणि काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत निराशाजनक ठरली. उद्धवसेनेच्या ४७ पैकी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसच्या ४७ उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचले, तर ४६ उमेदवारांना अपयश आले.
राष्ट्रवादी (शरद पवार) चे पाच जण, तर सहा अपक्ष बचावले
राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या ११ उमेदवारांपैकी पाच जणांचे डिपॉझिट वाचले, तर सहा जणांचे जप्त झाले. वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बसप आणि सनय छत्रपती शासन या पक्षांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवारांपैकी केवळ सहा उमेदवारांचे डिपॉझिट वाचले, तर १५९ अपक्षांची अनामत जप्त झाली आहे.
डिपॉझिट जप्त होण्याचे गणित
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, कोणत्याही उमेदवाराला त्याचे डिपॉझिट वाचवण्यासाठी मतांचा ठराविक कोटा पार करावा लागतो. प्रभागात पडलेल्या एकूण वैध मतांच्या किमान १/६ (सहावा हिस्सा किंवा एक षष्ठांश) मते मिळवणे अनिवार्य असते. एकूण वैध मतांच्या १६.६६ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली, तर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.
पक्षनिहाय उमेदवार व डिपॉझिट स्थिती
– भाजप : एकूण १२३, अनामत वाचली १२३, जप्त ०
– राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : एकूण १२०, अनामत वाचली ११९, जप्त १
– शिंदेसेना : एकूण ५८, अनामत वाचली १४, जप्त ४३
– उद्धवसेना : एकूण ४७, अनामत वाचली ०, जप्त ४७.
– काँग्रेस : एकूण ४७, अनामत वाचली १, जप्त ४६
– राष्ट्रवादी (श.प.) : एकूण ११, अनामत वाचली ५, जप्त ६
– वंचित बहुजन आघाडी : एकूण ३६, अनामत वाचली ०, जप्त ३६
– आम आदमी पार्टी : एकूण २९, अनामत वाचली ०, जप्त २९
– बसप : एकूण १६, अनामत वाचली ०, जप्त १६
– मनसे : एकूण १३, अनामत वाचली १, जप्त १२
– सनय छत्रपती शासन : एकूण ७, अनामत वाचली ०, जप्त ७
– पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडी : एकूण ७
– अपक्ष : एकूण १६५, अनामत वाचली ६, जप्त १५९
एकूण : एकूण उमेदवार ६९२, अनामत वाचली २६९, अनामत जप्त ४२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button