मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ

मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना दिलेल्या सुचनेनूसार दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ तारीख निश्चित केली होती.




















