ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख १३ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्क !

महिला मतदारांची संख्या ८ लाखांच्या पुढे, ३२ प्रभागांत निवडणूक रणधुमाळी, अंतिम यादी जाहीर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, शहरातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार नोंदले गेले आहेत. यामध्ये ९ लाख ५७ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ महिला, तर १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. वाढती मतदारसंख्या लक्षात घेता आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

प्रभागनिहाय आकडेवारी पाहता प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ७५ हजार १०५ मतदार असून, तो शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. यानंतर प्रभाग क्रमांक ३ (७२ हजार १०६) आणि प्रभाग क्रमांक २ (६९ हजार ५१८) या प्रभागांतही मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. दुसरीकडे प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी ३३ हजार ३३ मतदार नोंदले गेले आहेत.महिला मतदारांची संख्या अनेक प्रभागांमध्ये लक्षणीय असल्याचे चित्र आहे. काही प्रभागांत महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या जवळपास पोहोचले असून, याचा थेट परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर आणि मुद्द्यांच्या निवडीवर होणार आहे. तसेच इतर (तृतीयपंथी) मतदारांची नोंदही जवळपास सर्व प्रभागांमध्ये असल्याने समावेशक लोकशाहीचे चित्र दिसून येत आहे.

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या लक्षात घेऊन पक्षांकडून रणनीती आखली जात असून, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासकामे हे प्रचाराचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. वाढलेल्या मतदारसंख्येमुळे यंदाची महानगरपालिका निवडणूक अधिक निर्णायक आणि उत्सुकतेची ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला असून पारंपरिक (ऑफलाईन) स्वरूपात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. मतदान जनजागृती कार्यक्रम देखील महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला असून सर्व पात्र मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करावे, याकरिता जास्तीतजास्त प्रयत्न करण्यासाठी स्वीप मोहीम व्यापक करण्यात आली आहे.
– श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button