ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेची डेंग्यू मलेरियाच्या नायनाटासाठी जनजागृती मोहीम

आरोग्य विभागाकडून "सफाई अपनाओ, बिमारी भगाओ" अंतर्गत अनोखा उपक्रम

Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहिमेचा उत्साही शुभारंभ अटल बिहारी वाजपेयी उद्यान, पूर्णानगर येथे पार पडला.

या उपक्रमांतर्गत डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या आजारांपासून बचावासाठी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे तसेच या उपक्रमाच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कीटकनाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी तसेच हँड स्प्रे उपकरणांद्वारे घराघरात औषध फवारणी देखील करण्यात येत आहे.

याप्रसंगी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, तसेच आरोग्य निरीक्षक महिंद्र साबळे, गौरव दराडे, समाधान कातड, रामचंद्र शिंगाडे, आरोग्य सहाय्यक राहुल ककरोटी, आरोग्य मुकादम अनिल कांबळे, कैलास मांढरे, संतोष आरस्कर, कीटकनाशक मुकादम आगळे व महापालिका कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग:
या मोहिमेमध्ये विविध शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामध्ये एएसएम कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी (पूर्णानगर), विद्यावेली कॉलेज (शिवतेजनगर), कृती विकास समिती, करुणा महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, अमृतबिंदू बहुउद्देशीय संस्था, विश्वशांती बुद्ध विहार, नक्षत्र महिला बचत गट तसेच अरुण पाटोळे स्पोर्ट्स फाउंडेशन (पूर्णानगर) यांचा समावेश होता.

या सर्व संस्थांचा महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” ही स्वच्छतेची शपथ घेत आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधासाठी फक्त औषध फवारणी बरोबरच जनजागृतीलाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे.

— सचिन पवार
उप आयुक्त, आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button