ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची इच्छुक उमेदवार व पदाधिकारी बैठक; वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उद्या रविवार, दिनांक २१ डिसेंबरला सकाळी १०:३० वाजता पिंपरी येथील नमस्कार हॉटेल (विशाल थिएटरजवळ, रॉक्सी हॉटेल मागे) येथे पार पडणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सह प्रभारी  बी. एन. संदीप, चिंचवड व पिंपरी ब्लॉकचे प्रभारी  आदित्य पाटील, पिंपरी ब्लॉकचे प्रभारी  डॉ. मनोज उपाध्याय यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस अधिक प्रभावीपणे उतरावी, यासाठी इच्छुक उमेदवारांची भूमिका, संघटन बळकटीकरण, प्रभागनिहाय रणनीती तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित निवडणूक लढवण्याची दिशा यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बैठकीत पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांना एकत्रितपणे मार्गदर्शन करून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असून, आगामी निवडणुकीसाठी मजबूत उमेदवारांची निवड, बूथ पातळीवरील संघटन, जनसंपर्क वाढवण्याच्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पुन्हा एकदा ताकदीने उभी राहण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार असल्याने, आगामी निवडणूक रणधुमाळीत काँग्रेसची रणनीती या बैठकीतून स्पष्ट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button