“पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था ‘राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था’ पुरस्काराने सन्मानित — सलग पाचव्यांदा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपरी यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श पतसंस्था’ म्हणून गौरविण्यात आले आहे. सन २०२४-२०२५ या वर्षात पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत संस्थेला प्रतिष्ठेचा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील गोकर्ण–महाबळेश्वर येथे झालेल्या भव्य समारंभात कर्नाटक राज्याचे खासदार मा. श्री प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले, आमदार मा. श्रीमती शशिकला जोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे (अध्यक्ष – पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ), चेअरमन शिवाजी येळवंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव विश्वनाथ लांडगे आणि खजिनदार श्री अभिषेक फुगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या प्रसंगी संचालक मंडळातील सदस्य – चारुशिला जोशी, सनी कदम, नथा मातेरे, विजया कांबळे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, युनुस पगडीवाले आदी उपस्थित होते.
मा. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आणि सर्व संचालक मंडळ, सल्लागार व सभासद यांच्या सहकार्यामुळे संस्थेला सलग पाचव्यांदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
संस्थेच्या या यशाबद्दल सर्व संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग आणि सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













