ताज्या घडामोडीपिंपरी

स्वच्छतेचे खरे शिल्पकार सफाई सेवकच : उप आयुक्त सचिन पवार

२ हजारांहून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी – पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –
शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात सफाई सेवकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे असल्याने महापालिका नेहमीच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. यासाठी स्वच्छता सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच हेतूने आज हे सफाई सुरक्षा मित्र शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त सचिन पवार यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा – २०२५’ पंधरवड्यांचे औचित्य साधून डॉ. हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा कॉलनी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार बोलत होते.

या शिबिराचे प्रास्ताविक करताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव ढगे यांनी सफाई सेवकांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे, डॉ. शैलजा भावसार, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित, सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते , राजेश भाट, महेश आढाव, अंकुश झिटे श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, उद्धव डवरी, कांचनकुमार इंदलकर, सतीश इंगेवाड, स्वच्छता ब्रँड वैभव घोळवे, स्वच्छता दूत अरविंद भोसले, तानाजी भोसले यांच्यासह अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात नवीन थेरगाव, तालेरा, आकुर्डी, सांगवी, जिजामाता, यमुनानगर, भोसरी व वायसीएम रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी सफाई सेवकांची तपासणी केली. यामध्ये रक्त तपासणी, ॲनिमिया, हिमोग्लोबिन, हृदयविकार, मधुमेह, कॅल्शियम, हायपरटेन्शन आदींची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले. या शिबिरात तब्बल २ हजारांहून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन गोहतरे यांनी केले तर सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सफाई सेवकांना विविध योजनाचा लाभ व्हावा तसेच, त्यांना याची सविस्तर माहिती व मागदर्शन मिळावे या उद्देशाने माहितपर स्टॉल देखील यावेळी लावण्यात आला होता त्यामध्ये महिला व बालकल्याण कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना इत्यादी योजना समावेश होतो.

उपस्थितांनी घेतली वसुंधरेची शपथ:
भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की, मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन, या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कटीबध्द राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन.
अशी स्वच्छ, सुंदर हरित वसुंधरेची शपथ देखील उपस्थितांनी यावेळी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button