पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अंतिम प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने आज (दि.०६) मान्यता दिलेली आहे. या प्रभाग रचनेत प्रभागातील हद्दी बाबत २ हरकती सूचना पूर्णतः मान्य करण्यात आल्या असून ३ हरकती सूचना अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच इतर सर्व हरकती सूचना अमान्य करण्यात आल्या आहेत. या प्रभाग रचनेबाबतची प्रसिध्दी पिंपरी चिंचवड मुख्य कार्यालयात व क्षेत्रीय कार्यालयात करण्यात येणार आहे.
या प्रभागात करण्यात आलेत ‘हे’बदल..
०१) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ०१ मध्ये समाविष्ट असलेली ताम्हाणे वस्ती आता अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १२ मद्ये समाविष्ट करणेत आली आहे.
०२) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ०६ मधील गावजत्रा मैदान आणि मनपा हॉस्पिटल इत्यादी भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ०७ मध्ये समाविष्ट करणेत आला आहे.
०३) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग २४ मधील म्हातोबा वस्तीचा भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग २५ मध्ये समाविष्ट करणेत आला आहे.
०४) अंतिम प्रभाग रचनेत इतर कोणताही बदल नाही.
प्रभागाच्या व्याप्ती आणि वर्णनांमध्ये करण्यात आलेला बदल
०१) प्रभाग क्रमांक १० – (अण्णासाहेब मगर नगर, टिपू सुलतान नगर, बी.एस.एन.एल. परिसर एम.आय.डी.सी. ऑफीस चिंचवड या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक १० मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे.)
०२) प्रभाग क्रमांक ११ – (भिमशक्तीनगर या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक ११ मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे.)
०३) प्रभाग क्रमांक २६ – (वाकड या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक २६ मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे.)
३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक..
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असून, ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक संख्या कायम आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व ३२ प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाकडून आज मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच महापालिका मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयात देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.













