ताज्या घडामोडीपिंपरी

मनपाने फुटपाथ सुस्थितीत ठेवावेत – जागृत नागरिक महासंघाची मागणी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मनपा ने कोट्यावधी रुपये खर्च करून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात प्रशस्त फुटपाथ बनवलेले आहेत.मनपाने फुटपाथ सुस्थितीत ठेवावेत, अशी  मागणी जागृत नागरिक महासंघाने शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुटपाथ वरून चालणे हा पादचाऱ्यांचा प्रथम अधिकार आहे व फुटपाथ सुस्थितीत ठेवणे मनपाची जबाबदारी आहे.तथापि सदर फूटपाथ अनेक वेळा वेगवेगळ्या कामासाठी उदा. पाणी पाईपलाईन इलेक्ट्रिक केबल ड्रेनेज लाईन वगैरे साठी फोडले जातात पण काम पूर्ण झाल्यानंतर ते मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी मात्र पार पाडली जात नाही त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागते हा गंभीर विषय लक्षात घेऊन जागृत नागरिक महासंघाने पिंपरी चिंचवड मनपा शहर अभियंता मकरंद निकम  पिंपरी चिंचवड शहरातील सर्व फुटपाथ सुस्थितीत ठेवण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे व जे ठेकेदार किंवा पाणीपुरवठा/जलनिस्सारण/ विद्युत विभाग फुटपाथ तोडतील व पुरस्थितीत आणणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button