ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

शहराच्या प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संपूर्ण शहरात चार सदस्यीय ३२ प्रभाग तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवण्यात येणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचे पथक प्रभाग रचनेचे काम करीत आहे. १७ जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये प्रगणक गटांची मांडणी, जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगलमॅपवर नकाशे तयार करणे, जागेवर पाहणी करून प्रभाग रचना तयार करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहराची सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे.

त्या दृष्टीने प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग तयार करण्यात आले आहेत. गुगल अर्थ मॅपचा आधारे नकाशा तयार करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली आहे. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांची सुनावणी घेतली जाईल. दरम्यान, नवीन प्रभाग रचना फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीनुसार असणार असल्याचे सांगितले जात आहे.

१७ लाखांपेक्षा अधिक मतदार

पिंपरी-चिंचवड शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान ४९ हजार आणि कमाल ५९ हजार मतदार संख्येचा समावेश केला जाणार आहे. त्यानंतर १५ वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात १७ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार असल्याचे दिसत आहे. १ जुलै २०२५ ची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

त्यानुसार त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जाणार आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुदा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर तो प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त. निवडणूक विभाग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button