पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महर्षी वाल्मिकी महिला बचत गट, ऐश्वर्या महिला बचत गट, आवडी महिला बचत गट, भीमक्रांती महिला बचत गट, गायत्री महिला बचत गट, वैशालीताई काळभोर बचत गट, मत भिमाई महिला बचत गट या बचत बचत गटांना सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येणा-या खर्चास मान्यता, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २०२४-२५ करिता वाकड भगवान नगर परिसरात नवीन पाईप लाईन टाकणे तसेच वॉल्व्ह बसविणे, प्रभाग १६ किवळे येथील विभागीय कार्यालय इमारती मध्ये तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मजल्या करिता फर्निचर कामे करणे , जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजनाच्या साठी खर्चास मान्यता, कासारवाडी येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे नवीन वीज मीटर घेण्यासाठी महावितरणला शुल्क देणे, मुख्याध्यापक,मुख्य प्रशिक्षक यांच्या मध्यप्रदेश येथील एकलव्य फाउंडेशनच्या अभ्यास दौऱ्यासाठी येणा-या प्रवास खर्चास मान्यता देणे, आरोग्य विभागासाठी जंतूनाशक औषधे खरेदी करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ प्रभाग क्र. ३,४ व ५ येथे करण्यात आलेल्या ग्राफिकल वॉल पेंटिंग खर्चास मान्यता देणे, प्रभाग ११ मधील विविध रस्त्यांसाठी आय.आर.सी. मानांकनानुसार राईज पेडेस्त्रियन तयार करणे, कुदळवाडी व पवार वस्ती येथील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, प्रभाग १३ निगडी गावठाण परिसरात हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे, तसेच विविध सांस्कृतिक कामांकरिता मंडप व्यवस्था , प्रभाग १२ मधील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक तसेच सहयोग नगर ते टॉवर लाईन रस्ता यांची देखभाल व दुरुस्ती करणे, प्रभाग २४ मधील थेरगाव येथील नागुभाऊ बारणे शाळा इमारतीचे स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग २६ मधील पिंपळे निलख विशाल नगर येथे विविध मनपा व कंपन्यामार्फत खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील चरांची दुरुस्ती व डांबरी कारण करणे, मनपा शाळेतील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रातील परीक्षेकरिता उत्तर पत्रिका, प्रगती पुस्तके, व संचयिका छपाई खर्चास मान्यता देणे, चऱ्होली येथे जकात नाका प्रस्तावाने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे , प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना अतिक्रमण विभागाच्या वापरासाठी प्रत्येकी एक बोलेरो पिकअप व तत्सम वाहने भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे, इस्कॉन मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी रावेत खुली जागा क्रमांक ६ या ठिकाणी ११ महिन्यांच्या कालावधी करिता विनामुल्य पार्किग देणे, कासारवाडी आयटीआय वार्षिक परीक्षा बिल मटेरियल खर्च करणे, जाहिरात रोटेशन धोरण २०२५-२६ आदी विषयांसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.













