ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

प्रबोधन पर्वात शिवशंभो गर्जना, जुगलबंदी, व्याखान तसेच महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांचा समावेश

Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. चिंचवड येथील छत्रपती संभाजी नगर येथील साई मंदिर उद्यान येथे २५ व २६ जून रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आज (बुधवार ) सायं. ७.०० वाजता साई मंदिर उद्यान, छत्रपती संभाजी नगर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगर सदस्य,माजी नगरसदस्या तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन चरित्र सांगणारे व्याख्यान , रनवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते, अत्याधुनिक वाद्यांची जुगलबंदी, ढोल- ताशा वादन जुगलबंदी, महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा महाराष्ट्राची लोकधारा असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

विचार प्रबोधन पर्वाचे वेळापत्रक

२५ जून
सायं. ७.०० वजाता
वीर धुरंधर योध्यांचा जागर
‘शिवशंभो गर्जना’
रनवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते व अत्याधुनिक वाद्यांची जुगलबंदी
सादरकर्ते – अभिजित जाधव व आमु जाधव

स्थळ: साई मंदिर उद्यान, छत्रपती संभाजी नगर, चिंचवड

२६ जून
स. १०.०० वाजता
ढोल- ताशा वादन जुगलबंदी
स्थळ : के. एस. बी. चौक, पिंपरी

२६ जून
सायं. ५.०० वजाता
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान
सादरकर्ते – शाहीर प्रकाश ढवळे
स्थळ: साई मंदिर उद्यान, छत्रपती संभाजी नगर, चिंचवड

२६ जून
सायं. ७.०० वाजता
२५ कलाकारांचा समावेश असलेला लोकगीतांचा कार्यक्रम
महाराष्ट्राची लोकधारा
सादरकर्ते – जयेंदू मातोश्री प्रोडक्शन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button