ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२६ अखेर अधिकारी व कर्मचारी असे एकूण ३८ कर्मचारी सेवानिवृत्त

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२५ अखेर नियत वयोमानानुसार ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर ५ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

माहे जानेवारी २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये उप अभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले, जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधिक्षक किशोर काटे, चंद्रकांत विरणक, सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी, रत्नमाला जगताप, ए. एन. एम. मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा सुपरवायझर रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले, विलास गजरमल, मजूर काशिनाथ लांडे, आनंद जाधव, सुरेश किंद्रे, ज्ञानेश्वर बालवडकर, विलास लांडे, जानार्दन कदम, गणेश गव्हाणे, शिपाई राजू शिंदे, गायत्री जाधव, ज्ञानेश्वर भरेकर, देवीदास जगताप, सफाई कामगार रत्नाबाई धोत्रे, सुमन सावंत, अनिता माछरे, राजेश टकले, विलास सिताराम गाडे, सफाई सेवक अशोक शेट्टी यांचा समावेश आहे.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अटेंडंट मदतनीस संतोष गायकवाड, मुकादम प्रमोद अंदे, सफाई कामगार पवित्रा भागवत, सत्यवान वाळके, गटरकुली हणुमंता मुठे यांचा समावेश आहे.

महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, कार्यालयीन शिस्त आणि जबाबदारीची जाण ठेवत नागरिकाभिमुख सेवा दिली,त्यांच्या अनुभवाचा आणि योगदानाचा महापालिकेच्या कामकाजावर सकारात्मक ठसा उमटलेला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
– प्रफुल्ल पुराणिक, जनता संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क विभाग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button