ताज्या घडामोडीपिंपरी

तीन दिवसीय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 29 मे 2025 ते शनिवार दिनांक 31 मे 2025 असा तीन दिवसांचा जयंती महोत्सव घेण्यात येणार आहे.

या जयंती महोत्सवात गुरुवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत “खेळ रंगला पैठणीचा” हा खास महिलांसाठी चा कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच आयोजित वीस कलाकारांचा यशोगाथा अहिल्यादेवींची हा शाहिरी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
29 मे रोजीच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पुण्यश्लोक फाउंडेशन निर्मित महानाट्य पुण्यश्लोक हे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित 60 कलाकारांनी सादर केलेले अत्यंत वैभवशाली महानाट्य सादर केले जाणार आहे. हा कार्यक्रम देखील आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी संपन्न होणार आहे.

शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत खास महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा स्पर्धा हा स्पर्धात्मक कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांचे तीन प्रकारचे वयोगट तयार करण्यात आले आहेत. वयोगट 5 ते 15 वयोगट 16 ते 30 वयोगट 31 ते 60 याप्रमाणे प्रत्येक वयोगटाला प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 3 हजार रुपये, आणि तृतीय क्रमांक 1500 रुपये याप्रमाणे बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे.

दुपारी 3 ते 5 या वेळेत आचार्य अत्रे संत तुकाराम नगर याच ठिकाणी पारंपारिक महाराष्ट्राचे दर्शन घडविणारा “सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव कार्यक्रम” हा कोल्हापूर येथील 40 कलाकारांच्या माध्यमातून सादर केलेला कार्यक्रम होणार आहे.

30 मे 2025 रोजीच सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेमध्ये प्रसिद्ध व्याख्याते “नितीन बानगुडे पाटील” यांचे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित अंगावर शहारे आणणारे व्याख्यान आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी सादर होणार आहे.

आचार्य अत्रे सभागृह याच ठिकाणी दिनांक 30 मे 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार” हा अहिल्यादेवींच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदाच्या वर्षी पुरस्कार मूर्ती श्रीमती लता भानुदास करे या वयाच्या 64 व्या वर्षी आपल्या आजारी नवऱ्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी अनवाणी पायाने धावणाऱ्या बारामती येथील प्रेरणादायी महिलेस देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे असणार असून हा पुरस्कार गुरुवर्य श्री श्री मनोहर मामा भोसले तसेच पद्मश्री सन्माननीय गिरीश प्रभुणे साहेब या दोघांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य जयंती दिंडी यात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक पिंपरी येथील अहिल्यादेवी स्मारक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पलीकडील बाजूने पुन्हा पिंपरी मोरवाडी अहिल्यादेवी स्मारक या ठिकाण पर्यंत गोलाकार पद्धतीने काढण्यात येणार आहे. सदरची मिरवणूक सकाळी साडेदहा पर्यंत चालणार आहे.

याच दरम्यान सकाळी आठ वाजता सांगवी स्मारक या ठिकाणी गजनृत्य हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

सकाळी 10.30 वाजता सांगवी येथील स्मारकास आयुक्त यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण कार्यक्रम केला जाणार आहे.

सकाळी 11 वाजता मोरवाडी पिंपरी येथील स्मारकास आयुक्त तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण कार्यक्रम होणार आहे.

सकाळी 11.30 ते 12 या वेळेत कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नागरिकांसाठी चहा आणि नाष्टा याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

दुपारी 12 ते 1 या वेळेत स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि मान्यवरांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन हा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी 1 ते 3 या वेळेत जयंतू मातोश्री प्रोडक्शन यांचा मेरा भारत महान हा गाण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.

दुपारी 2 ते 4 या वेळेत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अन्नग्रहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सायंकाळी 4 ते 7 या वेळेत संगीत कथा नृत्य स्त्री शक्तीचा जागर हा समर्थ कला मंच पुणे यांच्यातर्फे सादर केला जाणारा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अशा पद्धतीने 3 दिवसांचा जयंती महोत्सव पूर्णपणे कार्यक्रमांनी भरलेला असा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button